बिहारमधील मुझफ्फरनगर येथे राहणाऱ्या तरुणाला फेसबुकवर एका तरुणीशी मैत्री करून तिच्याशी लग्न करणं महागात पडलं आहे. सुंधाशू असं या तरुणाचं नावं असून तरुणीचं नाव ऋचा आहे.काही महिन्यांपूर्वी सुधांशूची फेसबुकवर ऋचा नावाच्या तरुणीबरोबर मैत्री झाली. काही दिवसातच या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि सुधांशूने तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केले. महिनाभर दोघांमध्ये सर्व सुरळीत सुरू होते. सुधांशू ऋचाला खुश ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. पण ऋचाच्या वागण्यात फरक पडला. तिने त्याच्याशी सतत वाद करण्यास सुरुवात केली. एक दिवशी सुधांशु कामावर गेला असता तिने घरातून 4 लाख रुपयांचे दागिने घेतले व ती माहेरी निघून गेली. कामावरून घरी आल्यानंतर ऋचा माहेरी गेल्याचे सुंधाशूला कळाले. त्याने तिला फोनवर घरी येण्याची विनंती केली. पण 5 लाख रुपये दे तरच येईल अशी अट ऋचाने घातली. यास सुधांशूने नकार दिला. यामुळे ऋचाने पोलिसात त्याच्याविरोधात तक्रार केली. सुधांशू आपल्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप तिने केला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews